CDCC Bank Recruitment 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 358 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर आपले ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑक्टोबर 2024 आहे. ऑनलाइन अर्ज करण्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला खालील प्रमाणे मिळणार आहे.
सदर भरती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत होणार आहे. चंद्रपूर डीसीसी बँकेमध्ये 358 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात पाहू शकता. बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला भरतीचा प्रकार, शेवटची तारीख, किंवा इतर संपूर्ण माहिती बातमीच्या माध्यमातून मिळणार आहे.
वयोमर्यादा
सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे यादरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे होणार आहे. यासाठी परीक्षेला 560 रुपये फी उमेदवारास द्यावी लागेल.
अर्ज प्रक्रिया
सदर भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असणार आहे. खालील दिलेल्या वेबसाईटच्या मदतीने आपण यासाठी अर्ज करू शकता.
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच एमएससीआयटी किंवा संतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच शिपाई या पदासाठी अर्ज करायचा असल्यास किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे.
निवड प्रक्रिया
सदर भरतीची निवड प्रक्रिया बाबत माहिती जाणून घ्यायची झाल्यास याची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे असणार आहे. तुमची एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तुम्हाला भरती बाबतचे पुढील अपडेट्स दिले जातील.
CDCC Bank Recruitment 2024 Vacancy Details
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
CDCC Bank Recruitment 2024 FAQ
सदर भरती कोणत्या विभागात होणार आहे?
- सदर भरती ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती डीसीसी बँक अंतर्गत होणार आहे.
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत?
- 358 जागांसाठी ही भरती होणार आहे.
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील सर्वच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे की नाही?
- सदर भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.