Aarogya Vibhag Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील जर 12वी पास किंवा पदवीधर असाल तर तुम्हाला एका सरकारी नोकरी भरतीची खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती आपण बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल.
मित्रांनो ही भरती आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत होणार आहे. या विभागांमध्ये 20000 किंवा त्यापेक्षा अधिक पगारासह आपण ही नोकरी करू शकतो. तुम्ही देखील जर खूप दिवसांपासून सरकारी भरतीसाठी वाट पाहत असाल तर आता तुमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी 12वी पास किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी उमेदवारांना 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला 04 ऑक्टोबर 2024 अगोदर आपला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Aarogya Vibhag Recruitment 2024
मित्रांनो ही नोकरी नाशिक या ठिकाणी होणार आहे. तुम्ही देखील जर सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असाल तर यासाठी आपला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. खालील प्रमाणे तुम्हाला एक पत्ता दिलेला आहे. त्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज त्या ठिकाणी पाठवायचा आहे. अर्ज पाठवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभागाअंतर्गत तुम्ही पात्र आहात की नाही याबद्दल सांगण्यात येईल.
भरतीचा विभाग | सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक |
शैक्षणिक पात्रता | 12 वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा) |
एकूण रिक्त पदे | 169 |
वयोमार्यादा | 18 ते 38 वर्षापर्यंत |
वेतनश्रेणी | 15000/– रुपये ते 1,10,000+ |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 4 ऑक्टोबर 2024 |
परंतु यासाठी तुमचे शिक्षण बारावी किंवा कोणत्याही शाखेमधून पदवीधर असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही या भरतीसाठी आपला अर्ज करू शकता. लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करा जेणेकरून मित्रांनो तुमचे अर्ज देखील स्वीकारले जातील. अन्यथा 4 ऑक्टोबर 2024 नंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक या ठिकाणी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धत अर्ज करण्यासाठी दिलेली आहे. ऑनलाइन किंवा कोणतीही पद्धत यासाठी दिलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपले ऑफलाइन पद्धतीचे अर्ज पाठवा.
Aarogya Vibhag Recruitment 2024 भरती विभाग, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया
- भरती नाव – ही भरती सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक या अंतर्गत होणार आहे.
- वयोमर्यादा – सदर आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत यादरम्यान वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. (SC/ST उमेदवारांना 5 वर्षाची सूट मिळेल. OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 03 वर्षापर्यंतची सूट मिळेल.
- अर्जाची प्रक्रिया – मित्रांनो या भरती साठी ऑनलाइन पद्धतीचे अर्ज करण्यास आपल्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. परंतु मित्रांनो काही भरती अंतर्गत आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत
Aarogya Vibhag Recruitment 2024 Documents
- आधार कार्ड (Aadhar Card)
- दहावी बारावी गुणपत्रक
- एम एस सी आय टी सर्टिफिकेट
- जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
- डिग्री गुणपत्रक तसेच सर्टिफिकेट
- इत्यादी आवश्यक कागदपत्रे
Aarogya Vibhag Recruitment 2024 वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता
सदर भरतीसाठी आपल्याला वेतनश्रेणी किती मिळणार आहे, तसेच नोकरीचे ठिकाण कोणते राहील शैक्षणिक पात्रता काय आहे, याबद्दल माहिती पाहूया.
वेतनश्रेणी – सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक या ठिकाणी ही भरती होणार आहे. व यासाठी विविध पदे रिक्त आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे. त्यामुळे पदांनुसार वेतनश्रेणी राहणार आहे. परंतु सर्वच पदांसाठी 15,000 ते 1,10,000 पर्यंत आपल्याला या भरतीसाठी पेमेंट मिळू शकते. (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी)
शैक्षणिक पात्रता पदानुसार
पदे | शैक्षणिक पात्रता |
अस्थिरोग तज्ञ | MD/DNB/Diploma Ortho. |
भूल तज्ञ | MD/DNB/DIPLOMA ANESTHESIA |
वैद्यकीय अधिकारी M.B.B.S | MBBS |
वैद्यकीय अधिकारी B.A.M.S | BAMS |
स्टाफ नर्स | B.Sc Nusring / GNM |
ए. एन. एम. | A.N.M. |
मिश्रक | B-pharmacy / D-Pharmacy |
रक्तपेटी तंत्रज्ञ | M.Sc./ B.Sc. Micro Biology |
परिचर प्रयोगशाळा | 12th Science Pass |
संगणक ऑपरेटर | 12th Pass, MS-CIT, English Typing 40, Marathi Typing 30 |
Aarogya Vibhag Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया
- सर्वांत अगोदर खालील प्रमाणे दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धत देण्यात आली आहे.
- खालील प्रमाणे तुम्हाला फॉर्म ची लिंक दिली आहे तो फॉर्म एकदा मोबाईल मध्ये सेव्ह करा.
- नंतर त्या फॉर्म ची प्रिंट काढा व फॉर्म मध्ये आपले नाव, आपला मोबाईल क्रमांक, आपला ईमेल आयडी भरावा.
- नंतर आपले आवश्यक असणारी माहिती त्या ठिकाणी टाका जसे की आधार कार्ड असेल पॅन कार्ड किंवा इतर आवश्यक डॉक्युमेंट
- नंतर फॉर्म सोबत आपल्याला आवश्यक कागदपत्रे द्यायचे आहेत. जसे की 12वीचे गुणपत्रक 10वीचे गुणपत्रक.
- तसेच डिग्री पूर्ण असल्यास त्याचे सर्टिफिकेट
- इतर तुमच्याकडे कोणते प्रमाणपत्र असेल त्याची देखील झेरॉक्स तुम्ही त्यासोबत जोडून पाठवू शकता.
- आधार कार्ड व जन्म दाखला किंवा वयाचा दाखला त्यासोबत जोडून पाठवणे आवश्यक आहे. नाहीतर अर्ज बाद होईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
Aarogya Vibhag Recruitment 2024 Apply Form
अधिकृत PDF जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा |
अर्ज फॉर्म पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | सार्वजनिक वैद्यकीय विभाग, 3रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक |
Aarogya Vibhag Recruitment 2024 FAQ
सदर भरती कोणत्या विभागात होणार आहे?
- सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक या विभागात सदर भरती होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख?
- 4 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याची पद्धत?
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील बारावी पास व पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
निवड झालेल्या उमेदवारास किती वेतन मिळेल?
- 15000/– रुपये ते 1,10,000+ वेतन मिळू शकते. (अधिक महितीसाठी PDF जाहिरात पहा)