Ahmednagar DCC Bank Bharti 2024| अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 700 पदांसाठी भरती सुरू

Ahmednagar DCC Bank Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील जर दहावी पास असाल व कोणत्याही शाखेमधून पदवीधर झालेले असाल तर तुम्हाला नोकरीची खूपच चांगली संधी उपलब्ध आहे. कारण की मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून निघालेल्या या भरती अंतर्गत अहमदनगर डीसीसी बँक भरती 2024 द्वारा 700 उमेदवारांसाठी ही मेगा भरती होणार आहे.

 या भरतीसाठी आपण 13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करू शकतो. या भरती बाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आजचा ब्लॉग आपण शेवटपर्यंत वाचावा जेणेकरून तुम्हाला अर्जाची संपूर्ण पद्धत यासाठी आवश्यक कागदपत्रे व इतर संपूर्ण माहिती तुम्हाला समजू शकेल. तर जरासाही वेळ वाया न घालवता आपण माहितीला सुरुवात करू.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024

मित्रांनो “अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्यवर्ती सहकारी बँकेत” निघालेल्या या भरती अंतर्गत एकूण 700 जागा रिक्त आहेत. व या 700 जागांसाठी उमेदवारांकडून कर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवार 13 तारखेपासून म्हणजेच 13 सप्टेंबर 2024 पासून आपला अर्ज करू शकणार आहेत. व अर्जाची शेवटची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

 आपल्याला हे अर्ज 13 सप्टेंबर 2024 ते 21 सप्टेंबर 2024 पर्यंत हे अर्ज आपल्याला करता येणार आहेत. 21 सप्टेंबर नंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण की मित्रांनो काही जणांना अर्ज करण्यासाठी उशीर होत असल्याकारणाने त्यांचे फॉर्म देखील रीजेक्ट होतात. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Apply

मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरती अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया बद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तर आपल्याला ऑनलाईन परीक्षेद्वारे तसेच मुलाखती द्वारे आपली निवड केली जाणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला आपली कागदपत्रे व फॉर्म अपलोड करायचा आहे. फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर तुमची एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल व तुम्हाला कळवले जाईल की तुम्हाला नोकरी लागली आहे की नाही.

तुमची देखील बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या प्रायव्हेट जॉब साठी नक्कीच अर्ज करू शकता. या भरती बाबतची संपूर्ण माहिती तसेच निवड प्रक्रिया अर्जाची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. व कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Detailed information 

बँक शाखेचे नाव: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

एकूण रिक्त जागा: 700

रिक्त पदांची नावे: होणाऱ्या या सदर भरतीसाठी इन्चार्ज प्रथम श्रेणी (संगणक), जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, क्लेरिकल, इत्यादी पदांसाठी ही भरती होणार आहे.

कोणत्या उमेदवारांना अर्ज करता येणार: संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज स्विकारण्याची पद्धत: सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

निवड प्रक्रिया कशी असेल: या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाईन परीक्षांमध्ये आपल्याला 90% गुण असणार आहेत. तसेच मुलाखतीसाठी 10% गुण असणार आहेत.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 age Limit, Payment,IMP Dates

मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँके अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी आपल्याला अर्ज करायचा असल्यास आपल्याला काही अर्ज शुल्क लागणार आहे.

  • डेप्युटी मॅनेजर:- 885/- रूपये 
  • मॅनेजर:- 885/- रुपये
  • जनरल मॅनेजर:- 885/- रुपये
  • सुरक्षा रक्षक:- 696/- रुपये
  • वाहचालक:- 696/- रुपये
  • क्लेरिकल:- 749/- रुपये

वयोमर्यादा: 21 वर्षे ते 42 वर्षे

अर्जाची सुरू झालेली तारीख: सदर भरतीसाठी 13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत

अर्जाची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाणी अहमदनगर जिल्हा असणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही ठिकाणी नोकरी करावी लागू शकते.

वेतनश्रेणी बद्दल जर माहिती जाणून घ्यायची झाली तर वेतनश्रेणी ही प्रत्येक क्षेत्रासाठी म्हणजेच प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वेतन श्रेणी असणार आहे. वेतनश्रेणी आपण जाहिरातीच्या मदतीने पाहू शकतो. जाहिरातीची लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वेतनश्रेणी बाबतची माहिती समजू शकेल.

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Vacancies 

पदांची नावे  पद संख्या
सुरक्षा रक्षक 05
मॅनेजर 01
डेप्युटी मॅनेजर 01
वाहन चालक 04
क्लेरिकल 678
जनरल मॅनेजर 01
इन्चार्ज प्रथम श्रेणी 01
एकूण पदे 700

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Important Documents 

  • कनिष्ठ लेखनीय साठी पदवी प्रमाणपत्र तसेच कनिष्ठ शिपाई याच्यासाठी दहावीचे प्रमाणपत्र 
  • जन्मदिनांक चा पुरावा दहावीचे प्रमाणपत्र 
  • टंकलेखन प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्यास प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा समक्ष प्रमाणपत्र
  • तुमच्याकडे जर कोणती इतर प्रमाणपत्र असतील तर ती देखील तुम्ही अपलोड करू शकता
  • तसेच इतर आवश्यक कागदपत्रे लागतील

 

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 IMP Links

अधिकृत जाहिरात (1) जाहिरात PDF 1
अधिकृत जाहिरात (2) जाहिरात PDF 2
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा 

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Apply Process 

  • सर्वात अगोदर भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत बँकेची वेबसाईट ओपन करा 
  • त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती टाका जसे की आपले नाव, आपला ईमेल आयडी, आपला मोबाईल क्रमांक व आपला पत्ता.
  • संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला जर कोणते कागदपत्रे अपलोड करण्यास ऑप्शन येत असेल तर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा 
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तो फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करा 
  • फॉर्म जर व्यवस्थित भरलेला असेल तर ज्या कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत असाल त्या पदासाठी लागणारे जे अर्ज शुल्क असेल ते अर्ज शुल्क त्या ठिकाणी ऑनलाइन पेमेंट करा
  • अर्ज शुल्क भरल्यानंतर एकदा फॉर्म चेक करून सबमिट करा. 
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तो फॉर्म चेक करून तुम्हाला बँके द्वारा कॉल करून कळवण्यात येईल

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 FAQ 

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक सरकारी बँक आहे की खाजगी?

मित्रांनो सदर बॅंक ही एक प्रायव्हेट (खाजगी) बँक आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल? 

सदर भरतीची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असेल 

या भरतीसाठी आपण कोणत्या तारखेपासून अर्ज करू शकतो?

13 सप्टेंबर 2024 पासून या सदर भरतीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत 

या भरतीसाठी आपल्याला अर्ज करायचा असल्यास काही अर्ज शुल्क आहे का?

आपल्याला अर्ज करायचा असेल तर वेगवेगळ्या पदांनुसार अर्ज शुल्क आहे.

कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात?

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी महाराष्ट्रातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात

Leave a Comment