Canara Bank Bharti 2024 | कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू आपला ऑनलाईन अर्ज करा

Canara Bank Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील जर एका चांगल्या बँकींग क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असाल तर आजच्या बातमीचे माध्यमातून आपण कॅनरा बँक अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दल माहिती सांगणार आहोत. कॅनरा बँक अंतर्गत भरती किती पदांसाठी होणार आहे. यासाठी कोणकोणते उमेदवार अर्ज करू शकतात. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपली आजची बातमी शेवटपर्यंत जर वाचली तर तुम्ही यासाठी आपला अर्ज करू शकणार आहात. तर मित्रांनो कॅनरा बँक अंतर्गत ही भरती 3000 पदांसाठी होणार आहे.

कॅनरा बँक अंतर्गत होणारी ही भरती खूपच मोठी भरती असणार आहे. कारण की कॅनरा बँक अंतर्गत ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना काम करण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. कॅनरा बँक मार्फत 3000 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून उमेदवार आपला ऑनलाईन अर्ज करू शकतो.

Canara Bank Bharti 2024

मित्रांनो कॅनरा बँक अंतर्गत ही भरती होणार आहे. व यासाठी बरेचसे पदे रिक्त आहेत. ही भरती खूपच मोठी बँकिंग क्षेत्रामधील भरती असणार आहे. कॅनरा बँक अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी 3000 जागा रिक्त आहेत. व या 3000 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

भरतीचे नाव कॅनरा बँक भरती
एकूण रिक्त पदे 3000
अर्ज स्विकारण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे
शैक्षणिक पात्रता  पदवीधर
वेतनश्रेणी 15,000/- प्रशिक्षण कालावधी दरम्यान
वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे 

 

अर्ज करण्याची तारीख संपण्या अगोदरच आपल्याला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्जाची लिंक तुम्हाला बातमीच्या सर्वात शेवटी मिळणार आहे. परंतु त्या अगोदर आपण कोण कोणती पदे रिक्त आहेत किती पदसंख्या आहे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्जाची संपूर्ण पद्धती याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Canara Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

कॅनरा बँक अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी आपल्याला काही शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपले शिक्षण मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पूर्ण झाले असणे आवश्यक आहे. तुमची देखील पदवी जर मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या भरतीसाठी आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

लोकल भाषा टेस्ट

उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर उमेदवाराची एक टेस्ट घेतली जाते. यामध्ये दहावी बारावी स्टॅंडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट आपल्याकडे असणे आवश्यक आहे. यामध्ये लोकल लॅंग्वेज ची टेस्ट आपली घेतली जाईल. आपल्याला जर लोकल भाषेचे ज्ञान असेल तर आपले सिलेक्शन प्रोसेस मध्ये ऍड करून आपले डॉक्युमेंट ची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. परंतु आपण जर या लोकल भाषा टेस्टमध्ये पात्र ठरला नाहीत तर आपण ट्रेनिंग साठी पात्र ठरणार नाही.

Canara Bank Bharti 2024 वयोमर्यादा, मेडिकल टेस्ट

मित्रांनो तुम्हाला देखील कॅनरा बँक अंतर्गत सुरू झालेल्या या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपले वय हे कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. म्हणजे 01-09-1996 ते 01-09-2004 या दरम्यान तुचा जन्म झालेला असावा तुमचे देखील वय जर 28 वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तुमची थोडीफार मेडिकल टेस्ट देखील घेतली जाणार आहे जसे की तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

Canara Bank Bharti 2024 सविस्तर माहिती 

कॅनरा बँक अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी 3000 पदे रिक्त आहेत. व यासाठी आपले वय 20 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज हे 21 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत. व 04 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या अगोदर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. व अर्जाची पद्धती ऑनलाइन असणार आहे. याची निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. आपल्याला जर अनुभव नसेल तरी देखील आपण यासाठी अर्ज करू शकता. ही भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी होणार आहे.

Canara Bank Bharti 2024 अर्ज पद्धती

कॅनरा बँक अंतर्गत होणाऱ्या या 3000 पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. म्हणजे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही पत्त्यावरती अर्ज पाठवण्याची किंवा कोणत्याही दुकानात जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून यासाठी अर्ज करू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला काही आवश्यक डॉक्युमेंट्स लागणार आहे. ते तुम्हाला खालील प्रमाणे सांगण्यात आले आहेत.

Canara Bank Bharti 2024 Documents

  • आधार कार्ड 
  • दहावी व बारावीचे मार्कशीट 
  • पदवीधर प्रमाणपत्र 
  • उमेदवाराचा फोटो 
  • उमेदवाराची स्वाक्षरी 
  • डाव्या हाताचे थंब फिंगरप्रिंट 
  • व इतर आवश्यक डॉक्युमेंट्स. 

Canara Bank Bharti 2024 Apply Fees

आपल्याला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास आपल्याला यासाठी काही फीस लागणार आहे. जसे की दोन कॅटेगरीसाठी ही फी असणार आहे.

  • SC/ST/PwBD:- Nil
  • Others Category:- 500/-RS

Important Dates 

नोटिफिकेशन जाहीर झालेली तारीख 18 सप्टेंबर 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 सप्टेंबर 2024
अर्जाची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024

Important Links

अधिकृत जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ canarabank.com

 

Canara Bank Bharti 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सर्वांत अगोदर www.canarabank.com वेबसाईट वर भेट द्या 
  • त्यानंतर “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” वरती क्लिक करा 
  • त्यानंतर आपला मोबाईल नंबर व इतर माहिती टाका 
  • नंतर आपले नाव विचारले जाईल ते टाका 
  • नंतर एक पासवर्ड त्या ठिकाणी विचारेल तो पासवर्ड जनरेट होईल तो लिहून ठेवा 
  • तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईल SMS वरती देखील मिळून जाईल 
  • त्यानंतर उमेदवारांना आपला फोटो व आपली स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे 
  • फोटो व स्वाक्षरी अपलोड करा 
  • सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर एकदा ती माहिती व्यवस्थित चेक करा 
  • सर्व माहिती व्यवस्थित असेल तर “सेव अँड नेक्स्ट” वरती क्लिक करा 
  • नंतर तुम्हाला एसएमएस द्वारे आपल्या मोबाईल वरती एक रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड जनरेट होईल. व SMS येईल तो पासवर्ड आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवा. 
  • नंतर कोणत्याही एका UPI अँप वरून आपले पेमेंट करून आपला अर्ज Submit करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 

मित्रांनो या भरतीसाठी अर्ज हे 21 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत. व खूप जास्त पदांसाठी ही भरती होत असल्या कारणामुळे याचे अर्ज 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालू राहणार आहेत. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला 04 ऑक्टोबर 2024 अगोदर आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तरच तुमचे अर्ज ग्राह्य धरले जातील.

Canara Bank Bharti 2024 FAQ 

कॅनरा बँक अंतर्गत किती पदांसाठी हि भरती होणार?

3000 पदांसाठी सदर भरती होणार आहे

कॅनरा बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे

कोणत्या पदासाठी कॅनरा बँकेत भरती होणार आहे?

सदर भरती ही ग्रॅज्युएट, अप्रेंटिस या पदासाठी होणार आहे

कॅनरा बँक भरतीसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

उमेदवार कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक.

अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.

कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात?

भारतातील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार 

Leave a Comment