Chandrapur DCC Bank Bharti 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी भरती प्रक्रिया सुरू

Chandrapur DCC Bank Bharti 2024: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण रिक्त पदे 358 आहेत, व या पदांसाठी उमेदवारांकडून आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे तुम्हाला अंतिम तारीख संपण्याअगोदर अर्ज करायचे आहे.

तुम्ही देखील जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला यासाठी लवकरात लवकर आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तुम्हाला भरतीबद्दलची संपूर्ण माहिती जसे की रिक्त पदे किती आहेत, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेची फी, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. 18 ते 38 वर्ष यादरम्यान वय असणारे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही देखील जर या वयोमऱ्यादेमध्ये पात्र असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.

या बातमीच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तुम्हाला जर या भरतीबाबतची अधिकृत मूळ जाहिरात पाहिजे असेल तर त्याची लिंक देखील तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण या सदर भरती बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर एक वेळेस खालील प्रमाणे दिलेली मूळ जाहिरात वाचणे गरजेचे आहे.यामुळे तुम्हाला सर्व माहिती लक्षात येईल.

वयोमर्यादा

सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 38 वर्षे या दरम्यान असावे.

 अर्ज शुल्क 

सदर भरतीसाठी परीक्षेची फी 560/- रुपये एवढी असणार आहे.

अर्ज प्रक्रिया 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन अर्ज पाठवण्याची आवश्यकता नाही.

शैक्षणिक पात्रता 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस सी आय टी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच शिपाई या पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया 

सदर होणाऱ्या या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही कशी असेल याबाबत कोणत्याही प्रकारचे अपडेट समोर आलेले नाहीये. तुम्हाला खालील प्रमाणे जाहिरात पाहिल्यानंतर सविस्तर माहिती समजेल.

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Vacancy Details

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2024

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Chandrapur DCC Bank Bharti 2024 FAQ 

सदर भरती कोणत्या विभागासाठी होणार आहे? 

  • निवड झालेल्या उमेदवारास बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळणार आहे.

या भरतीसाठी एकूण पदे किती रिक्त आहेत? 

  • सदर होणाऱ्या भरतीसाठी 358 पदे रिक्त आहेत.

सदर भरतीसाठी कोणते उमेदवार करू शकतात? 

  • वर दिलेल्या शैक्षणिक पात्रता पात्र असणारे सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

उमेदवारांना आपले अर्ज कसे करायचे आहेत? 

  • सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

निवड झालेल्या उमेदवारास कोणत्या ठिकाणी नोकरी करावी लागेल?

  • सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास चंद्रपूर या ठिकाणी ही नोकरी करावी लागणार आहे.

Leave a Comment