ECHS Nashik Bharti 2024: मित्रांनो ECHS पॉली क्लिनिक देवळाली नाशिक विभागांतर्गत आता सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही देखील जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करू शकता अर्जाची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
तुम्ही देखील जर सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असाल तर या भरतीसाठी आपण अर्ज करू शकता. ईसीएचएस पॉलि क्लिनिक विभागाअंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी उमेदवारांना 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. तुम्ही देखील जर आणखी आपला अर्ज केला नसेल तर खालील प्रमाणे तुम्हाला पत्ता दिलेला आहे. त्या पत्त्यावरती तुम्हाला आपले अर्ज करून पाठवायचे आहेत.
ECHS Nashik Bharti 2024
मित्रांनो ही भरती ECHS पॉलि क्लिनिक विभागात होणार आहे. तुम्ही देखील जर या विभागात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला यासाठी आपले ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी कोणतेही ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर मूळ जाहिरात पहावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावरती पाठवू शकता. अर्जासोबत तुम्हाला आपले आवश्यक कागदपत्रे देखील पाठवायचे आहेत. ते आवश्यक कागदपत्रे कोणते याची माहिती आपण पाहणार आहोत.
मित्रांनो सदर भरतीसाठी तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास तुम्हाला सर्वात अगोदर मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर वेतनश्रेणी पदांबद्दल माहिती व इतर सविस्तर माहिती मिळेल. आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तर याची माहिती दिलेलीच आहे. परंतु तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही त्यांच्या ईमेल वरती कॉन्टॅक्ट करून देखील अधिक माहिती मिळवू शकता.
ECHS Nashik Bharti 2024 भरती बद्दल माहिती
मित्रांनो तुमची या भरतीसाठी निवड झाल्यास तुम्हाला वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लिपिक, सफाई वाला या पदांसाठी हि नोकरी मिळणार आहे. यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपले ऑफलाइन पद्धतीचे अर्ज सादर करायचे आहेत. तुम्हाला ही नोकरी नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही लांब ठिकाणी नोकरी साठी जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या महाराष्ट्रात राहून देखील ही नोकरी करू शकता. यासाठी एकूण 8 पदे रिक्त आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही, त्यामुळे आपण अगदी मोफत अर्ज करू शकतो.
यासाठी आपले शिक्षण कमी देखील असेल तरी देखील कोणतीही हरकत नाही. कारण की मित्रांनो, या भरतीसाठी उमेदवार हा 8वी पास 10वी पास किंवा 12वी पास अथवा मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर झालेला असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात देखील पाहू शकता.
ECHS Nashik Bharti 2024 भरती विभाग, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया.
- भरतीचा विभाग- ECHS पॉलीक्लीनिक विभाग
- वयोमर्यादा – सदर भरतीसाठी उमेदवाराचे किती वय आवश्यक आहे याबद्दलची माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाही.
- अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती – विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीची अर्ज प्रक्रिया देण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपले पोस्टद्वारे अर्ज पाठवावेत.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – सदर भरतीसाठी 19 ऑक्टोबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे.
- रिक्त पदाचे नाव – फार्मासिस्ट, लिपिक, वैद्यकीय अधिकारी, सफाईवाला ही पदे या भरतीसाठी रिक्त आहेत.
ECHS Nashik Bharti 2024 अर्ज पद्धत, पदसंख्या, नोकरीच्या ठिकाणाबद्दल माहिती
शैक्षणिक पात्रता-
मित्रांनो या भरतीसाठी विविध पदे रिक्त आहेत व या विविध पदांसाठी आपल्याकडे कोणती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे तुम्ही खालील प्रमाणे पहा.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लॅब असिस्टंट | DMLT अनुभवा सोबत श्रेणी 1 प्रयोगशाळा TECH COURSE |
फार्मासिस्ट | मान्यता प्राप्त विद्यापीठामधून किंवा संस्थेमधून बी फार्मसी किंवा मान्यता प्राप्त विद्या मंडळाकडून विज्ञान प्रवाह PCB+ 10+2 तसेच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत फार्मसी मध्ये डिप्लोमा मंजूर गरजेचे. तसेच 03 वर्षे कामाचा अनुभव. |
लिपिक | ग्रॅज्युएट क्लेरिकल ट्रेड |
सफाई वाला | साक्षर + अनुभव |
वैद्यकीय अधिकारी | MBBS+ अनुभव |
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – ECHS सेल, stn HQ, देवळाली, नाशिक या ठिकाणी आपल्याला आपले ऑफलाइन अर्ज पाठवायचे आहेत.
- मुलाखतीची तारीख – 24 ऑक्टोबर 2024
- एकूण रिक्त पदे – मित्रांनो सदर भरती ही 8 पदांसाठी होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज शुल्क – होणाऱ्या या सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
ECHS Nashik Bharti 2024 निवड प्रक्रिया
मित्रांनो अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील व त्याच्या आधारे ही भरती होणार आहे. मुलाखतीची दिनांक:- 24 ऑक्टोबर 2024 आहे. या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आपली मुलाखत द्यायची आहे.
वेतनश्रेणी – सदर भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारास 16,800/- ते 75,000/- रुपये एवढे वेतन मिळू शकते. हे वेतन पदावरती अवलंबून राहणार आहे. वेतनश्रेणी बद्दल काही अडचण असल्यास त्यांच्या ईमेलवर कॉन्टॅक्ट करा किंवा अधिकृत जाहिरात पहा.
ECHS Nashik Bharti 2024 Recruitment PDF Links
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ECHS Nashik Bharti 2024 अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्या अगोदर आपल्या खालील प्रमाणे दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचायची आहे.
- त्यानंतर एका कोऱ्या कागदावर किंवा एका फॉर्म वर आपला अर्ज लिहून वरील पत्त्यावरती पाठवायचा आहे. त्यासोबत असणारी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहेत.
- जसे की आपले आधार कार्ड, दहावी बारावीचे मार्कशीट, पदवीधर प्रमाणपत्र किंवा आपल्याकडे इतर कोणते आवश्यक कागदपत्रे असतील त्याचे झेरॉक्स त्या ठिकाणी पाठवा.
- ही सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडून तुम्हाला वरील पत्त्यावरती हे अर्ज पाठवायचे आहेत.
- अर्ज पाठवल्यानंतर तुम्ही जर या भरतीसाठी पात्र असाल तर तुम्हाला कॉल व एसएमएस द्वारे कळवण्यात येईल व इंटरव्यू साठी मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
ECHS Nashik Bharti 2024 FAQ
सदर भरतीसाठी एकूण रिक्त पदे किती आहेत?
- 08 पदांसाठी ही भरती होणार आहे.
भरतीसाठी कोणत्या पद्धतीचे अर्ज करायचे आहेत?
- सदर होणाऱ्या भरती अंतर्गत आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
कोणत्या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील?
- 19 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.