PSI Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील जर एका सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे. कारण की मित्रांनो एमपीएससीची भरती ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर समोर आलेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगात आता एक मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात देखील उपलब्ध झालेली आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी एकूण 615 रिक्त जागा उपलब्ध आहेत. व 615 उमेदवारांची निवड देखील करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
तुम्ही देखील जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच आनंददायक असणार आहे. कारण की मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी हे एमपीएससी व यूपीएससी ची तयारी करत असतात. परंतु त्यांना योग्य जाहिराती मिळत नसल्या कारणाने ते भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवनवीन भरती विषयी व जॉब विषयी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये होणाऱ्या या भरतीबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
PSI Bharti 2024
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये आता एमपीएससी द्वारा प्रकाशित झालेल्या या जाहिरातीमध्ये असे नमूद केलेले आहे की PSI भरतीसाठी 615 रिक्त पदे उपलब्ध आहेत. व पात्र उमेदवारांकडून यासाठी आपले अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर एमपीएससी किंवा यूपीएससीची तयारी करत असाल जर तुम्हाला देखील यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. अर्जाची संपूर्ण पद्धती व संपूर्ण जाहिरात तुम्हाला बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर समजेलच. परंतु मित्रांनो उमेदवारांची पीएसआय पदासाठी निवड केली जाणार आहे. यामुळे तुम्हाला पीएसआय होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. याची पीडीएफ वाचून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
भरतीचे नाव | PSI Bharti 2024 |
रिक्त पदाचे नाव | PSI |
एकूण रिक्त पदे | 615 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 07 ऑक्टोबर 2024 |
पीएसआय पदाची निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे. यामुळे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे काम करण्याची खूपच मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला देखील जर ही नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराला यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. कारण की मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. 7 ऑक्टोबर 2024 अगोदर आपल्याला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
PSI Bharti 2024 Notification
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये असे नमूद केलेले आहे की पीएसआय पदासाठी आता 615 पदे रिक्त आहेत. व ही 615 पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांकडून आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला पीएसआय पदासाठी ही नोकरी मिळणार आहे. तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी मिळवण्याची खूप म्हणजे खूपच उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे तुम्ही ही संधी गमवू नका तुमचे देखील स्वप्न जर महाराष्ट्र शासनामध्ये काम करण्याचे असेल तर तुम्ही या संधीचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे.
मित्रांनो ही भरती स्टेट गव्हर्मेंट द्वारे होणार असल्या कारणाने यासाठी 615 पदे रिक्त आहेत. व या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील जर ह्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला खालील प्रमाणे अर्जाची संपूर्ण पद्धत व आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रता याबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे तुम्ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
भरती नाव – PSI Bharti 2024
भरतीचा विभाग – सदर भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे होणार आहे.
भरतीचा प्रकार – आपल्याला महाराष्ट्र शासनामध्ये सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे
भरतीची श्रेणी – सदर भरती स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत होणार आहे
एकूण रिक्त पदे – विद्यार्थी मित्रांनो सदर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 615 पदांसाठी होणार आहे. व यासाठी 615 पदे रिक्त आहेत.
वयाची अट – मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत निघालेल्या भरतीसाठी आपल्याला काही वयोमर्यादेची अट देण्यात आलेली आहे. म्हणजेच की यासाठी आपल्याला 35 वर्षापर्यंतचे वय चालणार आहे. व मागासवर्गीय साठी 40 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
रिक्त पदांची नावे – मित्रांनो एमपीएससी द्वारा होणाऱ्या या सदर भरतीसाठी पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच की पीएसआय या पदासाठी ही सदर भरती होणार आहे.
वेतनश्रेणी – मित्रांनो पीएसआय पदी उमेदवाराची निवड झाल्यानंतर सदर भरतीद्वारे निवड होणाऱ्या उमेदवारास दरमहा 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये एवढे मानधन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी करावी लागणार आहे. कोणत्याही ठिकाणी उमेदवारास नोकरी लागू शकते.
भरतीचा कालावधी – विद्यार्थी मित्रांनो काही नोकरी भरती या काही वर्षांसाठी होत असतात. परंतु तुम्हाला निवड झाल्यानंतर ही नोकरी परमनंट देखील मिळू शकते.
अर्ज पद्धती – सदर भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – उमेदवाराला 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रता Education Qualification
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या नोकरी भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही शैक्षणिक पात्रतेची अट मान्य असणे आवश्यक आहे. कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे हे तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहे.
- अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही विद्या शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराची दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- लेखी परीक्षेद्वारे
- शारीरिक चाचणी
मुख्य लेखी परीक्षेच्या निकालाद्वारे शारीरिक चाचणीसाठी आर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. व उमेदवारांनी वेळीच त्या ठिकाणी सराव व पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. मुख्य लेखी परीक्षेच्या निकालानंतर सर्वसाधारणपणे दोन आठवड्याच्या अंतराने कधीही शारीरिक चाचणी आयोजित केली जाणार आहे. यासाठी चाचणीला पुरेसा वेळ मिळाला नसल्याच्या कारणास्तव शारीरिक चाचणीची दिनांक बदलता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे (Important Documents)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
परीक्षा शुल्क (Exam Fees)
- जनरल 844/- रुपये
- मागासवर्गीय / अनाथ 544/- रुपये
Important Links
अधिकृत PDF जाहिरातीसाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
विविध भरती,नोकरी बद्दल माहितीसाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज कसा करावा (How To Apply Online)
- सदर भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्याची लिंक व पीडीएफ जाहिरातीची लिंक तुम्हाला वरील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
- अर्ज करण्या अगोदर उमेदवारास काळजीपूर्वक एक वेळेस पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर एमपीएससीची ऑनलाईन वेबसाईट ओपन करा
- वेबसाईट ओपन न झाल्यास डेस्कटॉप साईट ऑन करा
- नंतर त्या ठिकाणी New Registration वर क्लिक करा
- नंतर आपला ईमेल क्रमांक मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाका
- नंतर Get OTP वर क्लिक करा.
- मोबाईल वरती आलेला ओटीपी दोन्ही ठिकाणी टाका.
- नंतर आपला एक नवीन पासवर्ड दोन्ही ठिकाणी टाका.
- नंतर आपण जन्मतारीख व आपले नाव त्या ठिकाणी टाकून आपल्या एका जवळच्या मित्राचे नाव त्याठिकाणी टाका. नंतर आपला ब्लड ग्रुप टाका, तुम्ही कोणत्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आहे ते वर्ष टाका.
- नंतर तुमचे हायस्कूलमधील आवडत्या शिक्षकाचे नाव टाका
- नंतर तुम्हाला आपला स्पोर्ट मधील कोणता आवडता खेळाडू आहे ते टाकून रजिस्टर वर क्लिक करा.
- रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपली काही पर्सनल माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. व जे कोणते आवश्यक डॉक्युमेंट्स विचारतील ती आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करा
- सर्व झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी फीज भरा व तुम्हाला कॉल व एसएमएस द्वारे परीक्षेसाठी व शारीरिक चाचणीसाठी अधिक माहिती देण्यात येईल.
- अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पीएसआय पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.
PSI Bharti 2024 FAQ
कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात?
- महाराष्ट्रातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात
सदर भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाणार?
- परीक्षेद्वारे व शारीरिक चाचणी द्वारे निवड केली जाईल
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती
- 07 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज कसा करायचा?
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार