SSC GD Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील जर 10वी उत्तीर्ण असाल व तुम्ही देखील जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला एका अश्या नोकरी बद्दल सांगणार आहोत ज्या नोकर भरतीसाठी 46,617 पदे रिक्त आहेत. व ही पदे लवकरच भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करू शकतो व ही भरती कोणत्या विभागाअंतर्गत होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहूया.
SSC GD Constable Bharti 2024
भरती विभाग | स्टाफ Selection कमिशन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारतात |
एकूण रिक्त पदे | 46,617 |
कोणती पदे रिक्त | GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पुरुष 41467 |
महिलांसाठी रिक्त पदे | GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी 5150 पदे रिक्त (फक्त महिलांसाठी) |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
आवश्यक वय | 18 ते 23 वर्षे |
मासिक वेतन | 69000 (वेगवेगळे असू शकते) |
अर्ज शुल्क | 100/- |
मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती सुरू झालेली आहे. व या कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 46617 पदे रिक्त आहेत. व या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्जाची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली आहे. व संपूर्ण माहिती देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल.
नोकरी विभाग
विद्यार्थी मित्रांनो ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणार आहे. भरतीची श्रेणी ही केंद्र श्रेणी असणार आहे. व नोकरीच्या ठिकाणाबाबत जर अधिक माहिती जाणून घ्यायची झालीच तर या नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे. कारण की तब्बल से 46617 पदे भरली जाणार असून यासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो.
पदांबद्दल माहिती
मित्रांनो आपल्याला तर माहिती झाले आहे की या भरतीसाठी तब्बल 46617 पदे रिक्त आहेत. परंतु यासाठी कोणकोणती पदे रिक्त आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहूया. GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी (पुरुष) साठी एकूण ४१४६७ पदे रिक्त आहेत. तसेच जीडी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी महिलांसाठी एकूण 5150 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज आपल्या मोबाईलद्वारे करू शकता. अर्ज करण्यासाठी काही अर्ज शुल्क आपणास लागणार आहे. काही अर्ज शुल्क भरून आपण आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.
फोर्स नुसार किती पदे रिक्त
Forces | रिक्त पदे (Vacancies) |
CISF | 13632 |
CRPF | 9410 |
SSB | 1926 |
BSF | 12076 |
SSF | 296 |
AR | 2990 |
ITBP | 6287 |
एकूण रिक्त पदे | 46617 |
शैक्षणिक पात्रता व इतर माहिती
मित्रांनो जीडी कॉन्स्टेबल अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी बरीचशी पदे रिक्त आहेत व यासाठी काही अटी व शर्ती देखील आहेत. तसेच उमेदवारांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. परंतु त्यासोबतच आपल्याला काही शैक्षणिक पात्रता देखील लागणार आहेत. त्या शैक्षणिक पात्रतांबद्दल माहिती जाणून घ्यायची झाली तर मित्रांनो यासाठी तुमची जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती उमेदवार मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
शारीरिक पात्रता (SSC GD CONSTABLE Bharti Physical Qualification)
शारीरिक पात्रता बद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची झाली तर पुरुषांसाठी जनरल एससी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 170 सेमी उंची तसेच 80/5 सेमी छाती असणे आवश्यक. तसेच एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 162.2 सेमी उंची व 76/5 सेमी छाती
महिलांसाठी किती उंची असणे आवश्यक पाहायचे झाले तर जनरल एस सी आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी 157 सेमी उंची व एसटी प्रवर्गातील महिलांसाठी 150 cm उंची अशाप्रकारे मित्रांनो पुरुषांसाठी व महिलांसाठी विविध प्रकारची उंची व छाती देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तुमची फिजिकल क्वालिफिकेशन केले जाईल.
SSC GD कॉन्स्टेबल वयोमर्यादा व सुट
अर्ज करण्याच्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एवढे वय जर तुमचे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही जर एससी व एसटी प्रवर्गातून येत असेल तर 05 वर्षापर्यंतची सूट मिळू शकते. तुम्ही जर ओबीसी प्रवर्गातून असाल तर 03 वर्षापर्यंतची सूट मिळेल. परंतु तुम्ही जर जनरल कॅटेगरी मधून येत असेल तर तुम्हाला वयाची कोणतीही सूट मिळणार नाही तुमचे वय हे 18 ते 23 वर्षांमध्ये हवे.
SSC GD कॉन्स्टेबल वेतनश्रेणी
या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवाराला 21700/- ते 69,100/- एवढे मासिक वेतन मिळू शकते. तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
SSC GD कॉन्स्टेबल भरती अर्ज शुल्क
मित्रांनो कोणत्याही विभागात आपल्याला नोकरी करायची असेल तर त्यासाठी अर्ज शुल्क तर लागतेच परंतु काही विभागांमध्ये अर्ज शुल्काची काहीच गरज नसते. परंतु या भरतीसाठी तुम्हाला काही अर्ज शुल्क लागणार आहे.
- OBC/GENERAL:- 100/-₹
- SC/ST/EXSM/महिला:- कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही
अधिकृत संकेतस्थळ, अर्जाची वेबसाईट, अधिकृत जाहिरात
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा
- सर्वांत अगोदर अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ओपन करा
- त्यानंतर सर्वात वरती लॉगिन Or Registration वर क्लिक करा
- Candidate वर क्लिक करून New User> Register वर क्लिक करा.
- Continue वर क्लिक करा
- आपला आधार कार्ड क्रमांक टाका
- खाली पुन्हा तोच आधार क्रमांक एंटर करा
- आयडेंटिफिकेशन कार्ड वरती क्लिक करून तुमच्याकडे कोणते कार्ड असेल तर तुम्ही ते टाकू शकता जसे ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, मतदान कार्ड, कॉलेजची किंवा स्कूलची आयडी, पॅन कार्ड, एम्प्लॉयमेंट कार्ड, इत्यादी त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता
- तुम्ही जे कोणते आयडेंटिफिकेशन कार्ड सिलेक्ट केले आहे त्याचा नंबर तुम्हाला खाली टाकायचा आहे.
- सर्टिफिकेट वर जे नाव असेल ते तसेच नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे
- नंतर आपली जन्मतारीख व वडिलांचे नाव टाका
- नंतर आपल्या आईचे नाव टाका
- नंतर तुम्ही दहावीची बोर्ड परीक्षा कोणत्या बोर्ड मधून दिली आहे सिलेक्ट करा.
- आपला दहावीला सीट क्रमांक कोणता होता तो टाका.
- तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला आहात ते त्या ठिकाणी टाका.
- नंतर तुम्ही कोणते एज्युकेशन क्वालिफिकेशन केले आहे ते त्या ठिकाणी टाका जसे की डिप्लोमा, ग्रॅज्युएशन इत्यादी
- नंतर आपला मोबाईल नंबर व आपली ईमेल आयडी टाका.
- नंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा
- नंतर तुम्हाला आपला नवीन पासवर्ड व काही ॲडिशनल माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. नंतर डिक्लेरेशन वरती जाऊन तुम्ही संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरला आहे का त्या ठिकाणी पहा.
- अर्ज जर व्यवस्थित भरला असेल तर अर्ज सबमिट करा.